Pink ribbon activity 1

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

Pink ribbon activity 1

Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan
ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट कशी केली जाते ?
 
पूर्वी ज्या आजाराला काही चिकित्सा नाही असे मानले जायचे त्या दुर्धर आजारावर विज्ञान आणि मेडिकल रिसर्च च्या जोरावर खूप प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध झाल्या आहेत.
 
प्रत्यक्षात ब्रेस्ट कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. एकदा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यावर त्याचा प्रकार कोणता हे ठरवणे फार गरजेचे असते.
 
1. Ductual Carcinoma - दुधाच्या ग्रंथींमध्ये सुरुवात होणारा कॅन्सर
 
2. Lobal Carcinoma – एका lobe पुरता ( विशिष्ट भागामध्ये ) मर्यादित रहाणारा कॅन्सर
 
3. इतर प्रकार
 
वरील दोन प्रकार सर्वात महत्वाचे व नेहमी आढळून येणारे आहेत. इतरही प्रकार आहेत पण त्या मानाने कमी.
 
सर्वात महत्वाचे ठरते ते म्हणजे निदानाच्या वेळी हा invasive ( पसरणारा ) आहे की noninvasive ( न पसरणारा ) ? यासाठी खालील पद्धतीने विचार करावा लागतो.
 
१. स्थानिक ट्रीटमेंट सर्जरी, रेडीएशन
 
ब्रेस्ट कॅन्सर जर फक्त स्तनापुरता मर्यादित असेल तर ऑपरेशन द्वारा तेवढाच भाग काढून टाकणे किंवा गरज असल्यास पूर्ण स्तन काढून टाकणे ही सर्वात सोपी आणि खात्रीलायक चिकित्सा ठरते.
 
रेडीएशन ऑपरेशन पूर्वी गाठीचा आकार कमी करण्यासाठी किंवा ऑपरेशन नंतर आजार पसरू नये यासाठी रेडीएशनचा वापर केला जातो. सामान्य भाषेत याला लाईट देणे असेही म्हणतात.
 
२. सार्वदेहिक ट्रीटमेंट किमोथेरपी, हार्मोन थेरपी, टार्गेट थेरपी, इम्युनोथेरपी
 
किमोथेरपी हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे, पण IHC testing नुसार किमोथेरपीसाठी वापरण्यात येणारी औषधे बदलतात. ब्रेस्ट कॅन्सरच्या काही गाठी ह्या केमोथेरपीपेक्षा हार्मोन थेरपीला चांगला प्रतिसाद देतात. ER/ PR +ve , HER +ve अशा अनेक प्रकारात हार्मोन थेरपीचा उपयोग होतो. टार्गेट थेरपी ही नवीन प्रकारची आणि अधिक स्पेसिफिक ट्रीटमेंट असून किमोथेरपी पेक्षा अधिक सुरक्षित आहे. किमोथेरपी मध्ये कॅन्सर पेशींसोबतच नॉर्मल पेशी सुद्धा मारल्या जातात, परंतु टार्गेट थेरपी मध्ये फक्त कॅन्सर पेशींवरच वार केला जातो. आजारामुळे आलेला अशक्तपणा, किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स यामुळे पेशंटचे शरीर अशक्त झाले असते. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणे हा सुद्धा कॅन्सर थेरपीचा एक भाग आहे.
 
३. इतर ट्रीटमेंट स्पेशल कंडीशनमध्ये उदा.प्रेग्नन्सी, लिव्हर disease, किडनी disease केली जाणारी ट्रीटमेंट ही त्या व्यक्तीचे बलाबल, औषधांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम यांचा विचार करून इतर ट्रीटमेंट दिली जाते.
 
कॅन्सर बाबत अनावश्यक भीती मनातून काढून टाकणे व जागरूकता निर्माण करणे हाच या activity चा उद्देश.
 
डॉ. गौरी
 



Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content