अॅनिमिया व आहार

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

अॅनिमिया व आहार

Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan
अॅनिमिया व आहार
 
अॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्तपेशींमध्ये लोहाची कमतरता असणे. ही कमतरता अनेक प्रकारांची असू शकते व त्यानुसार शरीरावर दिसणारे परिणाम ही वेगवेगळे असतात. अॅनिमियाचे साधारणपणे चारशेपेक्षाही अधिक प्रकार बघायला मिळतात परंतु ढोबळमानाने अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे , रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होणे, रक्तपेशींचा अधिक प्रमाणात नाश होणे या तीन प्रकारात अॅनिमियाचे वर्गीकरण करता येते.
 
शरीरात किती प्रमाणात हिमोग्लोबीन आहे यावर अॅनिमियाची लक्षणे व तीव्रता अवलंबून असते. तरीसुद्धा सर्वसाधारणपणे हिमोग्लोबीन कमी झाल्यास थोडे काम केल्यावर दमल्यासारखे वाटणे,चालताना धाप लागणे, डोकेदुखी, चक्कर, हृदयाची धडधड वाढणे, कोरडी, निस्तेज त्वचा,पायात गोळे येणे,वारंवार तोंड येणे, तोंडाला आतून जखमा होणे, नखं ठिसूळ होणे ही लक्षणे दिसतात. W.H.O ( World Health Organization ) च्या अभ्यासानुसार adult व्यक्तीमध्ये 12.5 ग्रम पेक्षा कमी हिमोग्लोबीन असल्यास त्याला अॅनिमिया म्हणावे. आपल्या देशातील रहाणीमान बघता आपल्याकडे साधारणतः 11 ग्रॅम ही हिमोग्लोबीनची किमान आवश्यक पातळी मानली आहे. त्यानुसार अॅनिमियाचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे
 
Mild 9 – 11 ग्रॅम Moderate 7 – 9 ग्रॅम Severe < 7 ग्रॅम
 
शरीरात प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोचवण्यासाठी, शरीराची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. व्यक्ती निरोगी असली तरी चयापचयाच्या क्रियेमध्ये फक्त 20 - 25 % इतकेच आयर्न शरीरात absorb होते. हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात आहारात लोहयुक्त घटकांचा समावेश केला पाहिजे. व्हिटामिन C च्या सोबत घेतल्यास आयर्न शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते.
 
वेगवेगळ्या प्रकारची धान्यं,कडधान्यं आणि पालेभाज्या यामध्ये लोह तत्व पुरेशा प्रमाणात असते. धान्यवर्गापैकी बाजरी आणि नाचणी यामध्ये लोह घटक अधिक प्रमाणात असतात. रोजच्या आहारात ५० ग्रॅम पालेभाजी खाल्ली तरी आयर्नची दिवसभराची गरज पूर्ण व्हायला मदत होते. वनस्पतीपासून मिळणाऱ्या आयर्न पेक्षा प्राणीज पदार्थातून मिळणारे लोह शरीरात लवकर शोषले जाते. आयर्न मिळवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे लोखंडी भांड्यांचा वापर. चपाती, भाकरी करताना निर्लेप तव्याऐवजी लोखंडी तव्याचा वापर करावा. लोखंडी कढई, झारे, उलथणे अशा लोखंडी वस्तूंचा वापर करावा, लोखंडी भांड्यांमध्ये अन्नपदार्थ तयार केल्यास लोहाचे अंश त्यात उतरतात. आहारात प्रामुख्याने vegetarian आणि Non vegetarian असे दोन प्रकार आहेत. आहारातून मिळणाऱ्या आयर्न Iron चेही Heme iron आणि Non Heme iron असे दोन प्रकार आहेत. वनस्पती स्त्रोतांमध्ये Non heme iron असते तर प्राणीज स्त्रोतांमध्ये उदा. प्राण्यांचे मांस,लिव्हर,गोड्या / समुद्राच्या पाण्यातील मासे, पोल्ट्री घटक यामध्ये Non heme iron अधिक प्रमाणात असते. Heme आयर्न पासून लोह घटक शरीरात लवकर व सोप्या पद्धतीने शोषले जातात. त्यामानाने Non heme iron कमी प्रमाणात शोषले जाते.
 
हालीम (अहाळीव),खजूर, करवंद, बीट, गाजर गुळ, बदाम, हातसडीचा तांदूळ, लाल साळीचा भात, लाल पालेभाजी, हळद,कारळे यामध्ये आयर्नचा मुबलक साठा असतो. पालेभाज्यांमध्ये आयर्न चांगल्या मात्रेत असते. आपण आयर्न मिळवण्यासाठी बीट व गाजर चा वापर करा असे सर्रास सांगतो पण गमतीची गोष्ट अशी आहे की बीटपेक्षा बीटच्या पानांमध्ये व गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये आयर्न अधिक प्रमाणात असते. हरभऱ्याचा पाला, चवळीचा पाला, लाल माठ, अळूची पानं, शेपू, मुळ्याची पान, विड्याची पानं यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात मिळते. दिवसभरात एकदा मूठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा खाल्ल्यास लोहाची कमतरता दिसून येत नाही.
 
डॉ.गौरी गणपत्ये
 
gurugouri@gmail.com
 
 
11.09.2019
 
लोकमत हॅलो सिंधुदुर्ग
 
लेख 9

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content