आहार आणि आजार

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

आहार आणि आजार

Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan
धन्यवाद 'लोकमत'
धन्यवाद श्री महेश सरनाईक
आजपासून 'लोकमत' मध्ये दहा दिवस "आजार आणि आहार" याविषयावर लेखमाला लिहित आहे.
आजचा पहिला लेख -
आहार आणि आजार
पडू आजारी मग मौज ही वाटे भारी ”.... यातला गमतीचा भाग सोडला तर आजारी पडणं कुणालाच आवडत नाही. व्यस्त दिनक्रम आणि कामधंद्यावर होणारे खाडे यांचा विचार करता आजकाल आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन गोळ्या घेऊन चटकन बरे होण्याकडे लोकांचा कल असतो. काही जणांना तर डॉक्टरांकडे जायलाही वेळ नसतो किंवा परवडत नाही. अशा वेळी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एखाद दुसरी गोळी आणायची आणि वेळ भागवून न्यायची असा प्रकार सर्रासपणे चालतो. एकंदरीत काय तर आजारी पडलं की घे गोळी आणि ने वेळ मारून ही आपली प्रवृत्ती होत चालली आहे.
जरा विचार करुया. आपण आपलीशी करत असलेली औषध संस्कृती योग्य आहे का ? आजारी पडल्यावर औषध घ्यायला हवेच, याबद्दल दुमत नाही, पण इकडे आजारी पडलं की लग्गेच तिकडे औषध घ्यायला हवय का ? त्या आधी दुसरा काही इलाज नाही का ? की प्रत्येक आजाराला फक्त औषध हाच पहिला आणि शेवटचा इलाज आहे ?
आहार, विहार आणि औषधी ही कोणत्याही व्यक्तीला उपचार करण्याचा चिकित्सा क्रम आहे. हा चिकित्सा क्रम आयुर्वेदाने सांगितला आहे. छोट्या छोट्या आजारपणात, आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत सर्वप्रथम आहारात बदल करावा. अशा वेळी आहार हे औषधाचे काम करते. त्या अवस्थेत गुण नाही मिळाला तर आहाराच्या जोडीला विहार ( आजारानुरूप व्यायाम ) चिकित्सा घ्यावी आणि त्यानेही उपशय मिळाला नाही तर औषधी चिकित्सेवाचून पर्याय नाही. विहार म्हणजे वागण्यातले बदल. Stretching पासून योगासने, Abs, Crunches, Push ups यांसारख्या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा यात समावेश होतो. आहाराच्या जोडीला रोज ३ किमी चालणे हा डॉ दीक्षित यांचा फॉर्मुला सगळीकडे फेमस आणि तितकाच यशस्वी झाला आहे.
खाणे हा आपल्या सर्वाचा आवडीचा विषय. रोजची झकझक कशासाठी करतो ? तर पोटासाठी असे अनेकांचे उत्तर असते. आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो ? हा खूप complicated आणि नाजूक प्रश्न आहे. अनेक जण म्हणतात जेवताना किती जेवलो हे मोजू नये, तर अनेक जण सांगतात तोलून मापूनच जेवावे. आहाराचे सुद्धा एक शास्त्र आहे हे अनेक जणांना माहीत नाही. निरोगी व्यक्तीचा आहार व आजारी व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो. वयाच्या अवस्थेनुसार शारीरिक बदल व आहारासंदर्भातील गरजा वेगवेगळ्या असतात. निरोगी व्यक्तीच्या आहाराला Balanced diet म्हणतात, तर आजारानुरूप बदललेल्या आहाराला Therapeutic diet असे म्हणतात.
चला तर मग, आजपासून पुढे दहा दिवस गणरायाच्या साक्षीने या आहारशास्त्राची आणि वेगवेगळ्या आजारातल्या आहाराची माहिती जाणून घेऊयात.
डॉ.सौ गौरी गणपत्ये
स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ
gurugouri@gmail.com
माणगाव, ता कुडाळ, जि सिंधुदुर्ग

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content