डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन

Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan

आपल्याला सुखी ठेवण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीची जबाबदारी आपण स्वत: स्वीकारली की अपेक्षाभंगाचे ओझे दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवता येत नाही आणि आपोआप आपण स्वत:ची चांगली काळजी घ्यायला लागतो. आपल्याला सुखी रहायचे असेल तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे फार महत्वाचे आहे. अर्थात आरोग्यासाठी शारीरिक फिटनेस जितका महत्वाचा, तितकाच मनाचा आनंद सुद्धा महत्वाचा. हे सूत्र मी मनापासून पाळते.
प्रॅक्टीस, मुलं, त्यांच्या शाळा, अभ्यास, माझं स्वत:चं Post-graduation चं शिक्षण यामध्ये स्वत:चे टाईमटेबल बदलण्याची वेळ अनेकदा माझ्यावर आली. मुलं लहान होती तेव्हा वेळेवर जेवण आणि झोप मिळणे, मुलांना सांभाळून दोन्ही वेळा प्रॅक्टीस चालू ठेवणे हे
माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. मुलांना भरवण्यासाठी जेव्हा वेळ काढत असे, त्याच बरोबर माझेही जेवण उरकून घेत असे. मुलांना लवकर झोपेची सवय लागावी म्हणून रात्री लवकर त्यांना खोलीत घेऊन गोष्टी सांगणे, गप्पा मारणे या मध्ये त्यांच्यासोबत (किंवा कधी कधी ती झोपण्यापूर्वी ) मी ही झोपून जात असे. आता मुलं मोठी झाली असली तरी कधी कधी डिलिव्हरीच्या किंवा अवेळी येणाऱ्या पेशंटमुळे जागरण होते किंवा झोपमोड होते. ते वगळून दुसरं काही महत्वाचं काम नसेल तर जागत रहाण्यापेक्षा अजूनही लवकर झोपणं मी prefer करते, त्यामुळे झोप पूर्ण होऊन सकाळी आपोआप लवकर जाग येते. कित्येकदा मी सकाळी साडे चार पाच वाजता उठून वाचत बसते. मी स्वत: एकही TV सिरीयल बघत नाही. मात्र माझ्या शंका कुशंका निरसनासाठी पुस्तकं, गुगल आणि You Tube चा भरपूर वापर करते.
वयाच्या चाळीशी पर्यंत मी नियमित असा व्यायामाचा सराव करत नव्हते, पण अचानक एका टप्प्यावर लक्षात आलं की आपल्या आईची बायपास सर्जरी झाली आहे, वडिलांच्या घराण्यात सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसताना आजी आणि वडील या दोघांनांही कॅन्सरचा सामना करावा लागला. आणि एकदम साक्षात्कार झाला, आता आपण आई आणि वडील या दोघांच्याही बाजूने रिस्क category मध्ये मोडतो. त्या क्षणाला एकदम हातपाय गळून गेले, पण नंतर शांतपणे विचार केला, आत्ता ह्या क्षणाला माझ्या हातात काय आहे ? तर माझ्या आयुष्याकडे सकारात्मक बघणे, आनंदी रहाणे आणि माझा फिटनेस मेंटेन ठेवणे. ही जाणीव जेव्हा झाली, तेव्हापासून व्यायाम आणि एकंदर दिनचर्या याकडे अधिक सजगपणे लक्ष पुरवायला लागले. व्यायामात विविधता ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं हे समजून घेण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार मी स्वत: शिकून घेतले. व्यायामासंदर्भात अनेक पुस्तके वाचली आणि अॅरोबिक व अनअॅरोबिक व्यायाम प्रकारची concept लक्षात आली. त्याच काळात रांगणा ग्रुपच्या संपर्कात आले. रांगणा रागिणीग्रुप मधल्या महिला डॉक्टरांचा फिटनेस बघून आपण किती मागे आहोत याची जाणीव झाली. सर्वात महत्वाची जाणीव झाली की आपल्याला फिटनेस साठी नुसतं Indoor नाही तर Outdoor exercises ची सुद्धा गरज आहे. आता मी त्याच्याकडे सुद्धा लक्ष देते. शाळा कॉलेज मध्ये असताना सायकलचा सराव होता, पण नंतर तो मागे पडला. “PAWS” ग्रुप मुळे एकदा सलग २५ किमी सायकलिंग केले आणि खूप छान वाटलं. आता पुन्हा सायकलिंग हा माझा आवडता outdoor exercise झालाय. वेळ मिळाला की मी १० ते १५ किमी सायकलींग करते. Indoor असेल तर किमान अर्धा ते पाऊण तास व्यायामासाठी वेळ देते. कधी योगासने, कधी upper body exercise, कधी lower body , कधी abs करते, तर कधी Zumba / Belly dance अशी त्यात विविधता ठेवण्याचा प्रयत्न करते. Dance हा एक खूप छान व्यायाम प्रकार आहे. त्याने physical fitness, stamina, flexibility वाढतेच पण मन सुद्धा खूप उल्हासित व आनंदित होते.
मुलांना आणि नवऱ्यालासुद्धा व्यायामाची आवड आणि सवय आहे. सकाळी घरातला सीन बघण्यासारखा असतो. सकाळी उठून Dumb bells, Skipping ropes आणि योगा मॅटसाठी प्रत्येक जण पकडापकडी करत असतो आणि आपापली जागा पकडून आपापला आवडीचा व्यायाम करत असतो. कधी कधी खूप घाई गडबड असते, अशा वेळी मी व्यायाम skip करण्यापेक्षा तुकड्या तुकड्यात व्यायाम करते. किचनमध्ये गॅसकडे लक्ष देत थोडा वेळ स्ट्रेचींग किंवा उभ्याने करायची योगासने किंवा dumb bells च्या साह्याने व्यायाम करते. संध्याकाळी १५ ते २० मिनिटे dance exercise करते. आता व्यायाम हा daily routine चा भाग झाला आहे.
स्वत: आयुर्वेदतज्ञ व आहारतज्ञ असल्यामुळे मी दीक्षित, दिवेकर किंवा कोणत्याही आहार लाटेत वहावत नाही. पूर्ण कुटुंब शुध्द शाकाहारी आहे. प्रत्येकाची भूक, dietary requirement, energy level व कामाचे स्वरूप याचा अंदाज घेऊन माझ्या व माझ्या कुटुंबातील सर्वांच्या आहाराचे योग्य वेळापत्रक बनवले आहे. त्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा कडधान्ये, आठवड्यातून दोन ते तीन वेळा पालेभाजी, सॅलेड, यांचा वापर आवर्जून करते. शाकाहारी लोकांना प्रोटीनची गरज भागवण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतात. यासाठी आहारात दुध, दही, ताक, मिश्र धान्यपीठ, शेंगदाणे, तीळ यांचा भरपूर वापर करते. सकाळी व्यायाम झाल्यानंतर एखादे फळ खाते. सकाळी ८ - ८.१५ वाजता नाश्ता करते. नाश्त्याला पोळी भाजी, पोहे, आंबोळ्या उसळ, राजगिरा लाडू व दुध, फोडणीचा भात यापैकी काहीही मेनू चालतो. दुपारी १ ते दीड या वेळात जेवण घेते. दुपारच्या जेवणात दीड पोळी, भाजी, सॅलेड, अर्धा वाटी भात, ताक किंवा दही. रात्री शक्यतो लवकर पण कमी जेवते. कित्येकदा कडकडून भूक लागली असेल तर सात साडेसात वाजता पटकन जेऊन घेते व पुढचे पेशंट तपासते. दिवसभरात नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असा तीन वेळा आहार घेते पण पोटात थोडी जागा ठेऊन जेवते. अधूनमधून हॉटेलमध्ये सुद्धा खाणं होतं. क्वचितप्रसंगी आवडीचा पदार्थ मनसोक्त खाते पण रोजच्या आहारात गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट अत्यंत मर्यादित स्वरुपात सेवन करते. आठवड्यातून तीन ते चार दिवस आठवणीने antioxidant ची गोळी घेते.
या सर्वात मन आनंदित ठेवण्याचा व्यायाम आवर्जून करते. मन फ्रेश राहण्यासाठी You tube वरचे छान motivational videos ऐकते, पहाते. कविता, लिखाण, वाचन आणि स्वत:च्या इतर आवडींसाठी आवर्जून वेळ काढते. गॉसिपिंग करणाऱ्या आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून कटाक्षाने दूर रहाते.
मला स्वत:ला या निरोगी आणि आनंददायी जीवनशैलीचा खूप फायदा झाला. आता मी सगळ्या पेशंटना व्यायामाचे महत्व पटवून सांगते आणि इतकेच नव्हे तर इच्छुक पेशंट्ससाठी आजारानुरूप आहार आणि व्यायाम यांचे मार्गदर्शन सुद्धा करते.
डॉ गौरी गणपत्ये
माणगाव, ता - कुडाळ
जिल्हा - सिंधुदुर्ग
9423511070Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content