वडाचे मनोगत...
डॉ गौरी
वडाचे मनोगत...
पुजा अगर नका पुजू
फांद्या नका देऊ कुजू
तोच नवरा सात जन्म
तुमच्या सेवेसी करतो रुजू
दिसता घोळका बायकांचा
दरदरून मला फुटतो घाम
समजून जातो मनात माझ्या
घेऊन आल्यात स्पेशल काम
बंधनं नकोत स्वतः साठी
नवरा मात्र मुठीत हवा
मला वेठीला धरुन ठेऊन
नवऱ्याकडून घेतात सेवा
स्पेस द्या एकमेकांना
संसार बघा खुलेल खास
मला आणि नात्याला
घेऊ द्या की मोकळा श्वास
प्रेम राहू द्या नात्यामध्ये
तुमची भांडणं सोडवा तुम्ही
प्रेमी युगुल बनून या
छान सावली देऊ आम्ही
जोड्याने एकदा हात जोडा
साताजन्माचा हट्ट सोडा
पुढचा दिवस पाहिला कोणी
आजचा आजच अबोला तोडा
प्रथेमधली थीम अशी की
नवरोबाची मिळू दे साथ
बाय पास करून मला आता
तुमची तुम्हीच भागवा बात....
डॉ गौरी