X आणि Y

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

X आणि Y

Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan
X म्हणजे हळवेपणा
अन् स्त्री म्हणजे double X
का बनवलस इतकं हळवं,
तिलाही आणि मलाही….?
माझ्या congenital X ला
मी Y चा एक तुकडा जोडलाय,
खूप मानसिक कसरत करून मिळवलेला…..
तो चपखल बसला की माझं आयुष्य सुखाचं असतं,
मी भरभरून जगते……
पण कधीतरी तो निखळतो, पडतो, घसरतो..
मग दु;खाचे कढ येतात,
आणि अपेक्षांची फुले करपतात……
पण देवा,
तू ही शेवटी पुरुष आणि diplomatic आहेस
निर्मितीच्या आधीपासून भावनांचा घोळ तुला माहीत होता
बोथट भावनांचं पारडं सुखाचं ठरणार हे बहुधा तुला ठाऊक होतं,
म्हणूनच ते तू पुरुषाच्या पदरात टाकलंस
आणि स्त्रीच्या पदरात..... भावनांचा भोवरा
निदान भावनांच्या chromosomes वर तरी सारखंच genetic coding करायचंस……!
तुझीच दोन्ही लेकरं XX आणि XY सुखी झाली असती....
आता मलाही करून ठेवलंयस तू
कमालीची हळवी
मी तुझ्याकडे सुख मागणार नाही,
देणारच असशील तर माझ्या X ला एक छोटीशी खाच दे…. कायमची
Y च्या मी मिळवलेल्या तुकड्यासाठी,
तो माझ्यामध्ये कायमचा एकरूप होण्यासाठी…..
कारण मला पक्कं कळून चुकलंय की
मिळतं ते सुख नसतं,
मानते ते सुख असतं
-गौरीHospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content